राज्यभरात दुचाकीस्वारांचे अपघात वाढत आहे. त्यामुळे राज्यात हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची सुरुवात पुणे शहरातून होणार आहे. पुणे शहरात दुचाकीस्वारच नाही तर सहप्रवाशांवरही आता हेल्मेट लागणार आहे. विनाहेल्मेट असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तमहायुतीच्या घटक पक्षांना महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळाले आहे. साताऱ्यात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकसंघपणे काम केले. वाई, खंडाळा, महाबळेश्वर मध्ये आमदार मकरंद पाटील यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार तसेच जिल्हा परिषद साताराने विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्था साताराचे संस्थापक समाजभूषण-दलितमित्र स्वर्गीय शिवराम माने (गुरूजी) यांच्या तृतीय पुण्यस्मृतीदिनानिमित्त विविध अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सविस्तर वृत्तसातारा विधानसभा मतदारसंघातील निर्विवाद यशामुळे भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सातार्यात श्री काळाराम मंदिर येथील श्रीरामाला अभिषेक आणि महाआरती करण्यात आली.
सविस्तर वृत्तगोडोली येथील भागामध्ये पाणी टँकर उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून पालिकेच्या परिवहन विभागाचे अधिकारी प्रशांत निकम गोडोलीचे माजी नगरसेवक शेखर मोरे यांच्यात जोरदार हमरातुमरी झाली.
सविस्तर वृत्तकारखानदार आमदार झाल्यानंतर तरी शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे व वेळेत उसाचे पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यात बहुतांशी कारखाने सुरू होऊन आता एक महिन्याचा कालावधी उलटला आहे.
सविस्तर वृत्तमध्यवर्ती बसस्थानकात पोहोचलेल्या एसटीचा किरकोळ मेन्टनन्स करण्याच्या निमित्ताने प्रवाशांना खाली उतरवून एसटी वर्कशॉपकडे घेऊन गेलेल्या चालकाने सीटवरील पर्समधील अडीच लाखांचे आठ तोळे दागिने लंपास केले.
सविस्तर वृत्तपोवई नाका येथील शू बॉक्स या दुकानाला वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अचानक आग लागली. ही घटना सायंकाळी पावणे आठच्या वेळेस घडली. आगीने रौद्ररूप धारण केले होते, मात्र तेथे कर्तव्यावर तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने वीज पुरवठा खंडित करून पाण्याने ही आग विझवली.
सविस्तर वृत्तमिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आठ दिवसांपासून तापमानात घसरण होऊ लागल्याने थंडीचा कडाका वाढू लागला आहे.
सविस्तर वृत्तक्रिडा महर्षी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक व शिवाजी उदय मंडळाचे मार्गदर्शक लक्ष्मणराव सदाशिवराव तथा बबनराव उथळे (आण्णा), (वय ९८) यांचे काल सोमवारी रात्री ९.३० वाजता वार्धक्याने सातारा येथे निधन झाले.
सविस्तर वृत्त