गेल्या तीन दशकांपासून माझ्याकडून कोणतीही चूक झाली नाही. कोणता अपघातही माझ्या हातून झाला नाही. बस अचानक अनियंत्रित कशी झाली, नेमके काय झाले, बसमध्येच बिघाड होता का, हे काहीच माहीत नसल्याचे चालक संजय मोरे पोलिसांना सांगत आहेत.
सविस्तर वृत्तपुरंदर तालुक्यातील खळद गावाची साक्षी कादबाने ही तरुणी आपल्या मेहनत, चिकाटी आणि ज्ञानाच्या जोरावर ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड, बंगळुरू येथे संशोधन आणि विकास विभागात व्यवस्थापकीय पदावर निवडली गेली आहे.
सविस्तर वृत्तइलेक्ट्रानिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमवर होणारे मतदान संशयास्पद असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आगामी सर्व निवडणुका ईव्हीएम नव्हे, तर मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदान घ्यावे, या मागणीचा ठराव कोळेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या करण्यात आला.
सविस्तर वृत्तभारत झपाट्याने विकसीत राष्ट्राकडे आगेकूच करत असला तरी भारताची खरी ओळख ही कृषीप्रधान देश अशीच आहे. आजही 60 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही ग्रामीण भागातच राहते. शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छननी केली जात आहे. या छननीत अनेक अर्ज अपात्र ठरत आहेत. पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत १० हजार बहिणी अपात्र ठरल्या आहेत.
सविस्तर वृत्तगुरूकुल एज्युकेशन सोसायटी संचलित गुरूकुल स्कूल या इंग्रजी माध्यम शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत असतात.
सविस्तर वृत्तमाहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना निकषानुसार अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीने मंजूर केलेल्या सातारा जिल्ह्यातील विविध पत्रकारांच्या अर्जांना राज्य समितीने मंजुरी दिली आहे.
सविस्तर वृत्तजिल्हा परिषदेच्या पुढील इमारतीला दिव्यांगाकरता पूर्वीचे असलेले रॅम्प व्यवस्थित नव्हते. तर पाठीमागच्या इमारती रॅम्प खूप उंच असून त्यास रेलिंग नाही. याबाबत दिव्यांग संघटनांनी सतत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाहीला रविवारी सुरुवात झाली.
सविस्तर वृत्तनगरपालिकेच्या जागांवर अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या बंद टपऱ्या हटविण्याची मोहीम पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हाती घेतली आहे. या कारवाईसाठी नेमण्यात आलेल्या पथकाकडून सोमवारी दिवसभरात राधिका रस्त्यावरील आठ टपऱ्या जप्त करण्यात आल्या.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला आहे. उसाचे गाळप सुरू असून वाहतूकही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु, अद्यापही प्रति टन उसाचा दर जाहीर केला नाही. याबाबत प्रशासनाने तातडीने बैठक लावावी. अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
सविस्तर वृत्त