महामार्गाच्या सहापदरीकरण कामामुळे पाचवड फाटा व नारायणवाडी परिसरात शेतात पाणी साचून राहिल्याने होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हयात, शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या आणि महाराष्ट्र शासनासह, जिल्हा परिषद साताराने विविध पुरस्कारांनी गौरविलेल्या, ‘श्री जानाई मळाई शिक्षण संस्था (जेमसेफ) सातारा’ या संस्थेने, संस्थेचे मार्गदर्शक-हितचिंतक-आधारस्तंभ ना. महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून, ‘समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, माने कॉलनी, कोडोली सातारा.’ येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास अभूतपूर्व-अद्भूत प्रतिसाद मिळून विक्रमी 1308 रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले.
सविस्तर वृत्तस्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांचे स्वप्न आणि धोरण होते की प्रत्येक तालुकास्तरावर विमानतळ असले पाहिजे. त्यानुसार कराड येथे विमानतळाची स्थापना झाली.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील कातकरी समाजासह इतर आदिवासी समाजापर्यंत पोहोचवून आणि केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान द्यावे.
सविस्तर वृत्तशासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मालामाल होणार आहेत.
सविस्तर वृत्तकाशीळ-सातारा रस्त्याजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव दुचाकी धडकून झालेल्या अपघातात बिळाशी (ता. शिराळा) येथील दत्तात्रय आनंदा पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तकांदाटी, सोळशी, कोयना व तापोळा विभागांतील झालेली विकासकामे रस्ते, पूल मोऱ्या ही निकृष्ट दर्जाची झाली असून, त्यांची चौकशी करून अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कारवाई करावी.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी शिवराज मोरे यांची निवड झाल्यानंतर कराड मध्ये प्रथमच आगमन झाले. शिरवळ पासून कराड या दरम्यानच्या प्रवासात टप्प्याटप्प्यावर त्यांचे जोरदार हार घालून जल्लोषी स्वागत करण्यात आले. शिवराज दादा आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, एकच वादा शिवराज दादा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी काँग्रेस एकसंघाची हाक दिली.
सविस्तर वृत्तपर्यटन विभागाकडून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटन सुरक्षा दल हा नाविन्यपूर्ण उपक्रम महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी राबविण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत या सुरक्षा दलाने अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे.
सविस्तर वृत्तस्वराज्याची शेवटची राजधानी असणाऱ्या सातारा शहर नगरपालिकेला सुध्दा ऐतिहासिक महत्व आहे. १५० वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या सातारा नगरपालिकेने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
सविस्तर वृत्त