सातारा जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट अखेर महसूल सप्ताह साजरा होत आहे. या निमित्ताने सातारा तालुक्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयात 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन उत्साहपूर्वक वातावरणात साजरा करून महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्वाचे फेरबदल करण्यात आले असून शिवराज मोरे यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तगेल्या अनेक वर्षांपासून कोयना अभयारण्यामुळे बाधित झालेले जावली तालुक्यातील वेळे गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत व सुविधांपासून दुर्लक्षित आहे. रेनकोट घालून पाऊसधारा झेलत खाचखळग्यांनी भरलेली चिखलवाट तुडवत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अतिदुर्गम वेळे गावातील अभयारण्यग्रस्तांची भेट घेतली.
सविस्तर वृत्तग्रामदैवत श्री अकलाई देवीच्या देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तकोयना धरणांतर्गत जलाशयात पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणात प्रतिसेकंद सरासरी 19,568 क्युसेक पाण्याची आवक होत असून पाणीसाठा 86.04 टीएमसी झाला आहे.
सविस्तर वृत्तयेथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस कै. जयश्री यशवंत कारखानीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कर्तृत्व गौरव पुरस्कार देण्यात येतो.
सविस्तर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ९ सप्टेंबरला मतदान होणार आहे.
सविस्तर वृत्तनांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीणीचा राधे कृष्ण एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट, जामनगर (गुजरात) येथे हस्तांतरण करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
सविस्तर वृत्तदरवर्षी राज्यात 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने सातारा तालुक्यात महसूल सप्ताहाचे 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तशेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे व पर्यावरणाच्या समतोलासाठी शेताचे बांध, माळरान, पडीक जमिनीवर शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करण्यासाठी ग्रामपंचायत विभाग (रोजगार हमी योजना), कृषी व सामाजिक वनीकरण विभाग गावोगावी जनजागृतीबरोबर शेतकऱ्यांशी संवाद साधत बांबू लागवडीचे महत्त्व सांगत आहेत.
सविस्तर वृत्त