बहीण-भावाच्या नात्याची विण अधिक घट्ट कारणार्या रक्षाबंधनसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध असून छत्रपतींची राजमुद्रा, रुद्राक्ष अक्रॅलिक, नाजूक कलाकारी व रेशमी धाग्यांच्या राख्या लक्षवेधी ठरत आहेत.
सविस्तर वृत्तधर्मादाय रुग्णालयांमध्ये त्यांच्या एकूण कार्यान्वीत खाटांपैकी 10 टक्के निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व 10 टक्के खटा दुर्बल घटकांतील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्याच्या पश्चिम घाट भाग आणि प्रमुख धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे तारळी धरणातून ही २ हजार क्युसेक विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तवाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (कडठझ) बसवणे बंधनकारक असताना, नेमलेल्या एजन्सींकडून प्लास्टिक ब्रॅकेटच्या नावाखाली वाहनधारकांची उघडपणे आर्थिक लूट सुरू आहे.
सविस्तर वृत्तराज्याच्या मंत्रिमंडळामध्ये लवकरच आठ मंत्र्यांच्या पदांवर गंडांतर येणार आहे, असे भाकीत खासदार संजय राऊत यांनी वर्तवले होते. या वक्तव्याचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातार्यात खोचक समाचार घेतला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणार्या कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे गुरुवारी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता केवळ पायथा वीजगृृहातून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सविस्तर वृत्तकृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या कृष्णा सहकारी बँकेला मुंबई येथे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन च्यावतीने सन 2023-24 साठीचा ‘पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सविस्तर वृत्तसाताऱ्यात एका शाळकरी मुलीला एकतर्फी प्रेमातून गळ्याला चाकू लावून एका युवकाने धमकावण्याचा प्रकार घडला होता. या घटनेत प्रसंगावधान राखून अमोल इंगवले, उमेश अडागळे यांनी त्या युवकाला अडवून त्या मुलीची सुटका केली आणि तिचे प्राण वाचवले.
सविस्तर वृत्तशिरवळ- सातारा महामार्ग लोणंद शहराबाहेरून वळविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभेचे प्रमुख व सुवर्णगाथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत यांनी लोणंदचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सविस्तर वृत्तपिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) येथील कार अपघातात जखमी झालेल्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. गंगूबाई शंकर माने (वय ७०, रा. पिंपोडे खुर्द) असे मृत महिलेचे नाव आहे.
सविस्तर वृत्त