निंभोरे ता. फलटण गावच्या हद्दीत पुणे- पंढरपूर पालखी महामार्गलगत गव्हाच्या रानात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.
विडणी, ता.फलटण येथील 25 फाटा ऊसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह आढळून आला असून उसाच्या शेतात महिलेच्या साडी जवळ नारळ, कुंकू, गुलाल, महिलेचे कापलेले केस, तेलाचा दिवा, काळी बाहुली, सुरी मिळून आल्याने सदर प्रकार अघोरी नरबळी असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
संपूर्ण राज्यात पाणंद रस्ते योजना शासनामार्फत चांगल्या प्रकारे राबवली जात आहे. फलटण कोरेगाव मतदार संघात पाणंद रस्त्यांची कामे अनेक ठिकाणी अपूर्ण असून शासनाने पाणंद रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर बरड (ता. फलटण) येथील बागेवाडी पेट्रोल पंपाजवळ कंटेनरच्या धडकेत कारमधील तीन जण ठार झाले. सागर रामचंद्र चौरे (वय ३४, रा. पाडेगाव, ता. खंडाळा), भाऊसाहेब आप्पा जमदाडे (वय ४५, रा. खेड बुद्रुक, ता. खंडाळा), नीलेश चंद्रकांत शिर्के (वय ४०, रा. वेटणे, ता. खटाव. मूळ रा. खटाव, ता. खटाव) अशी मृतांची नावे आहेत. काल पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.
भारताची लोकशाही जगात प्रसिद्ध आहे. लोकशाही जास्तीत जास्त प्रगल्भ होण्यासाठी आई-बाबांना प्लीज तुम्ही मतदान करा, असे आव्हान चिमुकल्यांनी स्वतः पत्र लिहून केले.
फलटण तालुक्यातील कोळकी येथील हॉटेल कामगाराचा खून केल्याप्रकरणी दोनजणांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी.
सातारा जिल्ह्याचे मुरब्बी व कसलेले राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे फलटणचे राजे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हातात घ्यायला वेळ लागणार नाही, असे वक्तव्य करून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.