शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या वतीने ऑगस्ट क्रांतिदिन आणि संस्थेचे मार्गदर्शक आमदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार, दिनांक 08 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
माण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या कथित विनयभंग प्रकरणाच्या तपासात विलंब होत असल्याचा आरोप करत पीडित मुलीच्या नातेवाईकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने सचिन देशमुख यांची सातारा तालुकाप्रमुख पदी अधिकृत नियुक्ती केली आहे. शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी 1 ऑगस्ट 2026 रोजी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.
श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलात गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
शहरातील प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी आपल्या प्रभागातील स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सातारा जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
पश्चिम महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आणि वरदान ठरलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव आता अधिकृतपणे बदलण्यात आले असून ते "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर" असे करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या संघटक स्मिता देशमुख तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेस, सातारा जिल्हा यांच्या पुढाकारातून 'दादांच्या' वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सातारा रनर्स फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणार्या देशातील लोकप्रिय आणि प्रतिष्ठेच्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल आणि थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण रविवारी सातारा क्लब येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन, संवर्धन व परिसर सुशोभीकरण, संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे संवर्धनासाठी कोट्यावधीची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.