अतिरागामुळे किंवा रक्तदाब वाढल्यामुळे मन अशांत राहते. या दोन्हीही स्थितीमध्ये आपली डावी नाकपुडी किंवा नासिका चालू असते. हे लक्षात घेता दररोज डावी नासिका एक तासापर्यंत बंद ठेवून उजव्या नाकपुडीने श्वासोच्छ्वास सुरू ठेवल्यामुळे म्हणजेच श्वास घेणे आणि सोडण्याची क्रिया केल्यामुळे रागावर नियंत्रण मिळवता येते, असे मुद्राशास्त्र सांगते. यासाठी योगसाधनेमध्ये शांत मुद्रा प्रभावी सांगितली गेली आहे.
सातार्यातील गोडोली येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी उघड केला. याप्रकरणात धाराशिव जिल्ह्यातून एकाला अटक करुन पोलिसांनी त्यांच्याकडून 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान, दुसर्या संशयिताचेही नाव समोर आल्यानंतर त्याला सातार्यातून अटक करण्यात आली.
सातारा जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनासह त्यांच्या विविध समस्यांसाठी विधानसभेमध्ये निश्चित पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही, कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार मनोज घोरपडे यांनी दिली आहे.
गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी मधील मुलांच्या वस्तीगृहात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणामुळे विद्यार्थीही सुखावले.
मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दराचा प्रश्न गाजत असून राज्यातील महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर तरी सोयाबीनला दर मिळणार का याकडे बळीराजाचे लक्ष लागून राहिले आहे. महायुती सरकार वचनपूर्ती करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघात सर्व धुरीणांचे अंदाज फोल ठरवत आ. मनोजदादा घोरपडे यांनी बाळासाहेब पाटील यांच्या गेल्या 25 वर्षीच्या सत्तेला धक्का देत मोठा विजय मिळवला. सातारा तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या असणार्या नागठाणे जिल्हा परिषद गटावर यावेळी सबकुछ मनोजदादा घोरपडे अशी हवा उमेदवारी जाहीर झाल्यापासून होती.
सातारा जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवप्रताप दिन हा तिथी ऐवजी तारखेवर साजरा करावा, अशी मागणी भारतीय रक्षक आघाडीचे सरचिटणीस अमर गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
सातारा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त सहकार्याने खाजगी सावकाराकडून दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 146 थोडी वजनाचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत.
सातारा शहरात बंद पडलेल्या टपऱ्या वाहतुकीच्या कोंडीचे कारण ठरत आहेत. त्यामुळे त्या हटवण्याचा धडाका पालिकेने लावला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सातारा पालिकेने सातारा मध्यवर्ती बस स्टँड परिसरातील तब्बल दहा टपऱ्या हटवल्या आहेत.
विधिमंडळाच्या नेतेपदी भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली असून येत्या गुरुवारी आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची ते शपथ घेणार आहेत.