ढोल-ताशांचा निरंतर गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, रोमांच उभा करणारा तुताऱ्या, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक अशा अलोट उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
माझी 2019 ची क्लिप फिरवली जात आहे. मी त्यावेळी म्हटले की ईव्हीएम हॅक होवू शकत नाही. हॅक हा टेक्निकल विषय आहे. हॅक म्हणजे मतदान झाले, मशिन सिल केले आणि बाहेरुन ऑपरेट केले असे होवू शकत नाही.
संभाजीनगर जिल्ह्यातील मुलीचे सातारा तालुक्यातील मुलाशी लग्न लावून दिले. एका महिन्याने मुलीला माहेरी नेले. मात्र, पुन्हा न पाठवून देता तिचे दुसर्याशी लग्न झाले आहे, असे सांगत तब्बल सव्वाचार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चारजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीने लग्नासाठी नकार दिल्याचे कारणावरुन चिडून जावून युवकाने घरावरती दगड मारुन सोलर फोडले. तसेच मुलीला मारहाण केली. हा प्रकार सातार्यात घडला.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मोबाईलची चोरी केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
पवनचक्कीमधील तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वास्तविक, डोळे निरोगी राहावेत आणि शेवटपर्यंत चांगले, कार्यक्षम राहावेत, यासाठी बालपणापासून पोषक आहार मिळणे आवश्यक असते. पूरक आणि पोषक आहारच इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांनाही कार्यक्षम आणि निरोगी राखू शकतो.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान दिले असून तें आचरणात आणण्याची आपली जबाबदारी असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज कराड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन अभिवादन केले.