सातारा जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात महत्त्वाचा प्रशासकीय बदल करण्यात आला असून उपअधीक्षकपदाची जबाबदारी आता शैला शंकर कोरडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
सातारा शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी समर्थ मंदिर ते बोगदा या मार्गावरील अतिक्रमण हटाव आणि रस्ता रुंदीकरण मोहिमेला नगरपालिका प्रशासनाने गती दिली आहे.
सातारा शहरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या ‘सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग’ अंतर्गत आयोजित ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला गुरुवारी छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथे उत्साहात प्रारंभ झाला.
सातारा पालिकेचे माजी नगराध्यक्ष, सातारा नगरपालिकेतील भाजपाचे पक्षप्रतोद निशांत पाटील यांनी 2025 मध्ये झालेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाणूनबुजून खोटी माहिती सादर केली आहे.
कंपनीच्या सुमारे 20 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनापरवाना मद्यप्राशन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी चार जणांवर कारवाई केली आहे.
गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
सातारा जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका बंदीवानाने ड्युटीवरील पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना आज दुपारी घडली.
संभाजीनगर ग्रामपंचायत आणी विलासपूर परिसरातील नागरिकांच्या वतीने NH-4 वरील शिवराज पंप, संभाजीनगर येथे मोठे अंडरपास उभारण्यात यावेत या मागणीसाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले.