पुरंदर तालुक्यातील खळद गावाची साक्षी कादबाने ही तरुणी आपल्या मेहनत, चिकाटी आणि ज्ञानाच्या जोरावर ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड, बंगळुरू येथे संशोधन आणि विकास विभागात व्यवस्थापकीय पदावर निवडली गेली आहे.
इलेक्ट्रानिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमवर होणारे मतदान संशयास्पद असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आगामी सर्व निवडणुका ईव्हीएम नव्हे, तर मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदान घ्यावे, या मागणीचा ठराव कोळेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या करण्यात आला.
सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग-3 धनंजय निकम यांच्यासह चारजणांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.
गुरूकुल एज्युकेशन सोसायटी संचलित गुरूकुल स्कूल या इंग्रजी माध्यम शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत असतात.
माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना निकषानुसार अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीने मंजूर केलेल्या सातारा जिल्ह्यातील विविध पत्रकारांच्या अर्जांना राज्य समितीने मंजुरी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या पुढील इमारतीला दिव्यांगाकरता पूर्वीचे असलेले रॅम्प व्यवस्थित नव्हते. तर पाठीमागच्या इमारती रॅम्प खूप उंच असून त्यास रेलिंग नाही. याबाबत दिव्यांग संघटनांनी सतत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाहीला रविवारी सुरुवात झाली.
नगरपालिकेच्या जागांवर अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या बंद टपऱ्या हटविण्याची मोहीम पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हाती घेतली आहे. या कारवाईसाठी नेमण्यात आलेल्या पथकाकडून सोमवारी दिवसभरात राधिका रस्त्यावरील आठ टपऱ्या जप्त करण्यात आल्या.
सातारा जिल्ह्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला आहे. उसाचे गाळप सुरू असून वाहतूकही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु, अद्यापही प्रति टन उसाचा दर जाहीर केला नाही. याबाबत प्रशासनाने तातडीने बैठक लावावी. अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
आजकाल अनेक लोक घरच्या बागेत, अंगणात किंवा बाल्कनीत वेगवेगळ्या भाज्या, फळे आणि मसाले पिकवतात. तुम्ही सुद्धा घरच्या घरी एखादे पिक लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुम्ही लहान वेलचीचा पर्याय सुद्धा निवडू शकता.
सातारा येथील एका धाडसी पत्रकाराने आत्महत्या करणार्याचे प्राण वाचविले आहेत. त्यांच्या या धाडसी कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.