राहत्या घरातून मुलीसह विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
संभाजीनगर, सातारा येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
मानवी अनैतिक व्यापार प्रकरणी चार जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला चुकीच्या दस्ताची दुरुस्ती करून त्याची सातबारा नोंद करणे कामी चार हजार रुपयांची लाच घेताना कुडाळ, ता. जावली येथील तलाठी शरद लिंबराज साळुंखे वय 54 रा. कोहिनूर रेसिडेन्सी, मधली आळी, वाई याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
सातारा जिल्हयात शैक्षणिक-सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष निर्मलसिंग जागिरसिंग बन्सल यांचे अल्पश: आजाराने दुख:द निधन झाले. मृत्यु समयी ते 63 वर्षे वयाचे होते.
अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील भूमीहिन कुटुंबांना चार एक जिरायती (कोरडवाहू) जमीन किंवा दोन एकर बागायती (ओलिताखालील) जमिन उपलब्ध करुन देण्यात येते.
जिल्ह्यातील ढगाळ वातावरण हळूहळू निवळू लागल्याने किमान तापमानात उतार येत चालला आहे. गुरूवारी सातारा शहरात १९.५ अंशाची नोंद झाली. त्यामुळे थंडी पुन्हा परतू लागली आहे. तर मागील तीन दिवसांपूर्वी किमान तापमान वाढून २२ अंशावर पोहोचले होते.
दिनांक 7 डिसेंबर रोजी सातारा जिल्हा क्षयरोग केंद्र सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस सातारा येथे 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
शिवप्रताप दिन तिथीवर साजरा करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा शिवभक्तांनी शिवतीर्थावर रविवारी शिवभक्तांनी आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनाचे पोस्टर छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात झळकविण्यात आले.
शिर्डी येथे झालेल्या अकराव्या राष्ट्रीय स्लिंगशाॅट (गलोरी) स्पर्धेमध्ये सातारचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे यांना खुल्या गटात रौप्य पदक मिळाले.