सध्या कराड शहरानजीक पुणे – बंगळुरू महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या वर्षभरात अपघातांत जवळपास 80 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे, ही मोठी गंभीर बाब असल्याचे मत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केले.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जडणघडणीत व उत्कर्षात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे थोर देशभक्त व स्वातंत्र्य सेनानी किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर यांची पुण्यतिथी शुक्रवार दिनांक २७/१२/२०२४ रोजी बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथे संपन्न झाली.
सविस्तर वृत्तभारतीय सैन्यदलाचा 77 वा वर्धापन दिन यंदा पुण्यात साजरा होत आहे. यानिमित्त आळंदी रस्त्यावरील बॉम्बे सॅपर्स या लष्करी संस्थेच्या मैदानावर भव्य कार्यक्रम होणार आहे.
सविस्तर वृत्तकोरेगाव भीमा इथे 1 जानेवारी 2025 ला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंगळवारी 31 डिसेंबर दुपारी दोन वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
सविस्तर वृत्तयावेळी ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले, मला ग्रामविकास पंचायत राज विभागाचा मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली आहे.
सविस्तर वृत्तकाही दिवसांपासून राज्यातील विविध विभागांतून धावणार्या शिवशाही बसचे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने अपघात, ब्रेकडाऊन लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यातील सर्व शिवशाहीची विशेष तपासणी विशेष अधिकार्यांमार्फत करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तशहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान येथील अमर जवान स्मृतीस्तंभावर वीर शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल पुष्पचक्र वाहून लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रताप सिंग, युद्ध सेवा पदक, चीफ ऑफ स्टाफ, सदर्न कमांड, पुणे यांनी सन्मानपूर्वक अभिवादन केले.
सविस्तर वृत्तआंधळी उपसा सिंचन योजनेमुळे माण तालुक्यातील गावांमधील शेतीच्या सिंचनासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. उपसा सिंचन योजनेचे काम मुदतीत पूर्ण करावे असे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले
सविस्तर वृत्तश्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाटण भेटीतून पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यातील श्रीमंत राजेभोसले व श्रीमंत सरदार पाटणकर घराण्याचा जिव्हाळा संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राला अनुभवायला मिळाला.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांना निधी देण्यात येईल. तसेच प्रकल्प गतीने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सविस्तर वृत्त