कोयनानगर विभागातील रासाटी येथून पाऊलवाटेने नानेल या आपल्या गावाला जाणार्या एकनाथ जाधव या शेतमजुरावर गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गव्याने पोटात शिंग खुपसल्याने एकनाथ यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी कोयना विभागात घडली.
सविस्तर वृत्तराज्यातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱ्या गणवेश वाटपासंदर्भात महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या सरकारने सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याची जबाबदारी स्वत: उचलली होती.
सविस्तर वृत्तभारतीय संघातील नामवंत क्रिकेटपटू विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. सध्या तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळत असून तिसऱ्या कसोटीत तो फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही.
सविस्तर वृत्तकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत काढलेल्या कथित अवमानकारक उदगारांवरून देशाच्या राजकारणात वादळ निर्माण झालं आहे. आज संसदेपासून देशातीली विविध भागात अमित शाह यांच्या या विधानाविरोधात तीव्र पडसाद उमटले.
सविस्तर वृत्तपरळी खोर्यात वन्य प्राण्यांचे पाळीव जनावरांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहेत. दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राण्यांवर हल्ले होत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर वन विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
सविस्तर वृत्तपश्चिम महाराष्ट्राचे आकर्षण असणार्या बांधकाम विषयक रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ या प्रदर्शनाच्या भव्य मंडप व स्टॉल उभारणीचा शुभारंभ बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष सुधीर ठोके व सेक्रेटरी हर्षद वालावलकर, उपाध्यक्ष सयाजी भोसले, खजिनदार पृथ्वीराज पाटील व असोसिएशनचे सर्व माजी अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य व अन्य मान्यवरांच्या यांच्या शुभहस्ते व असोसिएशनचे पदाधिकारी सदस्यांच्या उपस्थितीत भूमीपूजन करून व श्रीफळ फोडून जिल्हा परिषद मैदान येथे झाला.
सविस्तर वृत्तसातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे, कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर भोईटे, उपाध्यक्षपदी उमेश भांबरे, सचिवपदी गजानन चेणगे, संघटकपदी अजित जगताप, खजिनदारपदी अमित वाघमारे यांच्यासह १३ जणांच्या कार्यकारिणीची लोकशाही मार्गाने निवडणूकीची प्रक्रिया पार पाडून बिनविरोध निवड झाली.
सविस्तर वृत्तफेब्रुवारी 2023 मध्ये सातारा तालुक्यातील नागठाणे येथील एका घाडगे रुग्णालयात एक महिला प्रसूतीसाठी आली होती. त्यावेळी त्याठिकाणी संबंधित डॉक्टर उपस्थित नव्हते. मात्र, डॉक्टरांनी फोनवरुन सांगून ही प्रसूती कम्पाउंडरने केली. त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांची चूक आणि निष्काळजीपणा यामुळेच हा प्रकार घडला.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दराबाबतची बैठक झाली. उपळवे येथील स्वराज ग्रीन पॉवर ॲड फ्युएलचे प्रतिनिधी अनुपस्थित, इतर १६ कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सविस्तर वृत्तसंपूर्ण राज्यात पाणंद रस्ते योजना शासनामार्फत चांगल्या प्रकारे राबवली जात आहे. फलटण कोरेगाव मतदार संघात पाणंद रस्त्यांची कामे अनेक ठिकाणी अपूर्ण असून शासनाने पाणंद रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
सविस्तर वृत्त