जिल्ह्यातील ढगाळ वातावरण हळूहळू निवळू लागल्याने किमान तापमानात उतार येत चालला आहे. गुरूवारी सातारा शहरात १९.५ अंशाची नोंद झाली. त्यामुळे थंडी पुन्हा परतू लागली आहे. तर मागील तीन दिवसांपूर्वी किमान तापमान वाढून २२ अंशावर पोहोचले होते.
सविस्तर वृत्तदेशातील सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन स्पर्धेपैकी एक म्हणून ओळखली जाणारी वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन सातार्याच्या कालिदास हिरवेने जिंकली. 2 तास 18 मिनिटे आणि 19 सेकंदांच्या वेळेसह, सातार्याच्या कालिदास हिरवेचा कोर्स रेकॉर्ड केवळ पाच सेकंदांनी चुकला.
सविस्तर वृत्तकेदारनाथ-बद्रीनाथपासून शिमलापर्यंत उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या शहरांमध्ये मोसमातली पहिली बर्फवृष्टी पहायला मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणी निसर्गाचे मनमाेहक दृष्य निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्तदिनांक 7 डिसेंबर रोजी सातारा जिल्हा क्षयरोग केंद्र सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस सातारा येथे 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
सविस्तर वृत्तशिवप्रताप दिन तिथीवर साजरा करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा शिवभक्तांनी शिवतीर्थावर रविवारी शिवभक्तांनी आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनाचे पोस्टर छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात झळकविण्यात आले.
सविस्तर वृत्तढोल-ताशांचा निरंतर गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, रोमांच उभा करणारा तुताऱ्या, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक अशा अलोट उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तमाझी 2019 ची क्लिप फिरवली जात आहे. मी त्यावेळी म्हटले की ईव्हीएम हॅक होवू शकत नाही. हॅक हा टेक्निकल विषय आहे. हॅक म्हणजे मतदान झाले, मशिन सिल केले आणि बाहेरुन ऑपरेट केले असे होवू शकत नाही.
सविस्तर वृत्तराज्यातील नव्या सरकारने आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यापासून २१०० रुपये महिना द्यावा. तसेच महाराष्ट्र राज्याचा हक्क दुसऱ्या कुठल्या राज्याला देऊ नये. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा करावी, असा टोला सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला लगावला.
सविस्तर वृत्तदेवदिवाळीचे औचित्य साधून लांजा तालुक्यातील साटवली गांगोवाडी येथील तरुणांनी एकत्रित येत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साटवली गढी येथे हजारो दीपोत्सव प्रकाशित केले आणि देवदीपावली साजरी केली. त्यामुळे दिव्यांच्या प्रकाशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली साटवली गढी उजळून निघाली होती.
सविस्तर वृत्तग्रामविकासामध्ये प्रभावी काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्यावतीने देशपातळीवर देण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे.
सविस्तर वृत्त