गुरूकुल एज्युकेशन सोसायटी संचलित गुरूकुल स्कूल या इंग्रजी माध्यम शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत असतात.
सविस्तर वृत्तमाहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना निकषानुसार अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीने मंजूर केलेल्या सातारा जिल्ह्यातील विविध पत्रकारांच्या अर्जांना राज्य समितीने मंजुरी दिली आहे.
सविस्तर वृत्तजिल्हा परिषदेच्या पुढील इमारतीला दिव्यांगाकरता पूर्वीचे असलेले रॅम्प व्यवस्थित नव्हते. तर पाठीमागच्या इमारती रॅम्प खूप उंच असून त्यास रेलिंग नाही. याबाबत दिव्यांग संघटनांनी सतत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाहीला रविवारी सुरुवात झाली.
सविस्तर वृत्तनगरपालिकेच्या जागांवर अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या बंद टपऱ्या हटविण्याची मोहीम पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हाती घेतली आहे. या कारवाईसाठी नेमण्यात आलेल्या पथकाकडून सोमवारी दिवसभरात राधिका रस्त्यावरील आठ टपऱ्या जप्त करण्यात आल्या.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला आहे. उसाचे गाळप सुरू असून वाहतूकही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु, अद्यापही प्रति टन उसाचा दर जाहीर केला नाही. याबाबत प्रशासनाने तातडीने बैठक लावावी. अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
सविस्तर वृत्तमुंबईतील कुर्ला एलबीएस रोडवर काल (९ डिसेंबर) भीषण अपघाताची घटना घडली. सोमवारी रात्री भरधाव बेस्ट बसने गर्दीच्या ठिकाणी घुसून पादचाऱ्यांना चिरडले आणि अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४२ जण गंभीर जखमी झालेत.
सविस्तर वृत्तसातारा येथील एका धाडसी पत्रकाराने आत्महत्या करणार्याचे प्राण वाचविले आहेत. त्यांच्या या धाडसी कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हयात शैक्षणिक-सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष निर्मलसिंग जागिरसिंग बन्सल यांचे अल्पश: आजाराने दुख:द निधन झाले. मृत्यु समयी ते 63 वर्षे वयाचे होते.
सविस्तर वृत्तअनुसुचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील भूमीहिन कुटुंबांना चार एक जिरायती (कोरडवाहू) जमीन किंवा दोन एकर बागायती (ओलिताखालील) जमिन उपलब्ध करुन देण्यात येते.
सविस्तर वृत्तइलेक्ट्रिकल व्होटिंग मशिन म्हणजेच ईव्हीएम मशिनवर होणारे मतदान संशयास्पद होत आहे, असे आमचे मत आहे. त्यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकीत ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकेवर ठप्पा मारून (बॅलेट पेपरवर) मतदान घ्यावे, अशी मागणी कोळेवाडी ग्रामस्थांनी केला आहे.
सविस्तर वृत्त