सातारा जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवप्रताप दिन हा तिथी ऐवजी तारखेवर साजरा करावा, अशी मागणी भारतीय रक्षक आघाडीचे सरचिटणीस अमर गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
सविस्तर वृत्तसातारा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त सहकार्याने खाजगी सावकाराकडून दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 146 थोडी वजनाचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा शहरात बंद पडलेल्या टपऱ्या वाहतुकीच्या कोंडीचे कारण ठरत आहेत. त्यामुळे त्या हटवण्याचा धडाका पालिकेने लावला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सातारा पालिकेने सातारा मध्यवर्ती बस स्टँड परिसरातील तब्बल दहा टपऱ्या हटवल्या आहेत.
सविस्तर वृत्तविधिमंडळाच्या नेतेपदी भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली असून येत्या गुरुवारी आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची ते शपथ घेणार आहेत.
सविस्तर वृत्तसातारा येथील शिवछत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला मंत्रीपद द्यावे, अन्यथा वीजवाहक टॉवरवरुन उडी मारुन आपले जीवन संपवेन, अशी धमकी देणार्या होमगार्ड मध्ये जवान असणार्या एका तरुणाने आपला व्हिडिओ व्हायरल करीत एकच खळबळ उडवून दिली होती.
सविस्तर वृत्तजिल्हयाची अर्थवाहिनी आणि सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक असलेल्या जनता सहकारी बँक साताराच्यावतीने सायबर सिक्युरिटी या विषयावर कार्यशाळा आणि प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे लष्कर पाणी पुरवठा केंद्रामार्फत पुरवठा होणाऱ्या ग्राहकांकडे 5 हजार किंवा त्यापेक्षा जास्त पाणी देयक थबाकी आहेत, अशा सर्व ग्रहाकांनी पाणी देयके 15 डिसेंबर पर्यंत भरावीत, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उपविभाग क्र. 1 चे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे.
सविस्तर वृत्तयुवा कार्यकर्त्यांचे प्रभावी संघटन कौशल्य, शेतकरी व महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन, मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन, तसेच सामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आ. मनोज घोरपडे यांनी केलेले कार्य डोळ्यांसमोर ठेवून जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले आहे, असे मत प्रा. दशरथ सगरे यांनी व्यक्त केले.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीतील ज्या पद्धतीने निकाल लागले आहेत तो संशयास्पद आणि संभ्रम निर्माण कराणारे आहेत. यासंदर्भात पुणे येथे सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन केले.
सविस्तर वृत्तवर्षानुवर्षे बंद असलेल्या टपऱ्यांच्या विरोधात सातारा पालिकेने कारवाईचे हत्यार उपसले आहे. पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने दुपारी बाराच्या दरम्यान दोन तास कारवाई करून दहा टपऱ्या जप्त केल्या.
सविस्तर वृत्त