तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळामुळे (Cyclone Fengal) जोरदार पाऊस पडत आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे तिरुवन्नमलाई येथील घरांवर सुमारे ४० टन वजनाचा मोठा दगड कोसळल्याने ५ मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्तबदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करणार्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण हलक्यात घेऊ नका, असे खडेबोल सीआयडीला सुनावले.
सविस्तर वृत्तजिल्ह्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे. हवामानात बदल होत असून, सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. पावसाची शक्यता व ढगाळ हवामान यामुळे रब्बीतील कांदा, गहू, ज्वारी तसेच बारमाही हळद, आले आदी पिकांना रोगराईचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
सविस्तर वृत्तशहर व जिल्हाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो, असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटर तर्फे आयोजित २०२४” हे बांधकाम क्षेत्राशी निगडीत भव्यदिव्य प्रदर्शन जिल्हा परिषद ग्राऊंन्ड, सातारा येथे दिनांक २६, २७, २८, २९ डिसेंबर, २०२४ यावेळी (सकाळी १०.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत) आयोजित केले आहे.
सविस्तर वृत्तवर्षाच्या शेवटच्या महिन्याला आज सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी ग्राहकांना एक धक्का बसला आहे. कारण ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ केली आहे.
सविस्तर वृत्तबंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फेंगल चक्रीवादळ पुद्दुचेरीजवळील किनारपट्टीवर शनिवारी आदळले. (Cyclone Fengal) यामुळे या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सविस्तर वृत्तबेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत केलेल्या वाढीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
सविस्तर वृत्तयंदा राज्यात दर वर्षीच्या तुलनेत चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये राज्यात चिकुनगुनिया रुग्णांची संख्या यावर्षी सर्वाधिक असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. या गोष्टीला प्रशासन पुरेपूर मदत करत आहे. त्यामुळे बेकायदेशीर काम करुन शेतकऱ्यांना लुटण्यासाठी नवनविन क्लुप्त्या काढल्या जात आहेत.
सविस्तर वृत्तराज्य सरकार स्थापनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे निर्णय घेतील. ते जे निर्णय घेतील त्याला माझा व शिवसेनेचा पूर्ण पाठींबा राहणार आहे. त्यामुळे आता किंतु-परंतु हे कोणीही मनामध्ये आणू नये, मी मनमोकळेपणाने काम करणारा मुख्यमंत्री असल्याचे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सविस्तर वृत्त