सातारा तालुक्याच्या आठ गट आणि 16 गणाच्या राजकीय समीकरणांमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 62 उमेदवारांनी राजकीय विनंतीला मान देऊन आपली तलवार म्यान केली तर गटासाठी 46 उमेदवार रिंगणामध्ये अंतिम राहिल्या असून यामध्ये 24 पुरुष आणि 22 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
सविस्तर वृत्तजावळी तालुक्यातील बोंडारवाडी धरण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणारच असून, “कोण आडवा येतो ते मी बघतो” असा सज्जड इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता धरणाचे राजकारण करणाऱ्यांना दिला.
सविस्तर वृत्तसातारा येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने अद्यावत शववाहिनीचे प्रजासत्ताक दिनी गांधी मैदान राजवाडा येथे श्री. सुभाष दोशी, श्री. सुधाकर पेंडसे, श्रीमती शिल्पा सातपुते व श्री. राजेंद्र चोरगे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
सविस्तर वृत्तहिंदुहृदयसम्राट वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांची पहिली शाळा धननीची बाग येथील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या निवासी शाळेत सामाजिक उपक्रम राबवून जन्मशताब्दी साजरी करण्यात आली.
सविस्तर वृत्तहिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आणि शिवप्रेरणा प्रतिष्ठानचा सातव्या वर्धापन दिनी प्रतिष्ठांनच्या वतीने आयोजित केलेले सर्वच उपक्रम कौतुकास्पद असून कुपर उद्योग समूह नेहमीच प्रतिष्ठानच्या पाठीशी उभे राहील असे गौरवउदगार कूपर उद्योग समूहाचे मुख्य मानव संसादन अधिकारी श्री नितीन देशपांडे यांनी काढले.
सविस्तर वृत्तभूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मोजणी बाबत हरकत घेऊनही दखल न घेतल्यामुळे भोंदवडे, तालुका सातारा येथील शेतकऱ्यांनी 26 जानेवारी 2026 या प्रजासत्ताक दिनी दोन अधिकाऱ्यांना जबाबदार धरत आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
सविस्तर वृत्तशुभेच्छुक :-*निलेश शिंदे* *सोहम डेव्हलपर्स*
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा परिषद पाटखळ गटातून रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांच्या पत्नी संजना प्रकाश साबळे यांनी रयत क्रांती पक्षाच्यावतीने निवडणूक नामनिर्देशन पत्र आज मोठे शक्तिप्रदर्शन करत दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त३४ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा शहर व अक्षय ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी,कर्मचारी तसेच सातारा शहरातील नागरिकांसाठी मंगळवार दि २० रोजी वाहतूक शाखेच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सविस्तर वृत्तरहिमतपूर पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेल्या नागरिकांच्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात रहिमतपूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून एकूण २ लाख ९० हजार रुपये किमतीचे २० मोबाईल हस्तगत करून ते मूळ तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्त