कारखानदार आमदार झाल्यानंतर तरी शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे व वेळेत उसाचे पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यात बहुतांशी कारखाने सुरू होऊन आता एक महिन्याचा कालावधी उलटला आहे.
सविस्तर वृत्तमध्यवर्ती बसस्थानकात पोहोचलेल्या एसटीचा किरकोळ मेन्टनन्स करण्याच्या निमित्ताने प्रवाशांना खाली उतरवून एसटी वर्कशॉपकडे घेऊन गेलेल्या चालकाने सीटवरील पर्समधील अडीच लाखांचे आठ तोळे दागिने लंपास केले.
सविस्तर वृत्तपोवई नाका येथील शू बॉक्स या दुकानाला वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अचानक आग लागली. ही घटना सायंकाळी पावणे आठच्या वेळेस घडली. आगीने रौद्ररूप धारण केले होते, मात्र तेथे कर्तव्यावर तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने वीज पुरवठा खंडित करून पाण्याने ही आग विझवली.
सविस्तर वृत्तमिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आठ दिवसांपासून तापमानात घसरण होऊ लागल्याने थंडीचा कडाका वाढू लागला आहे.
सविस्तर वृत्तक्रिडा महर्षी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक व शिवाजी उदय मंडळाचे मार्गदर्शक लक्ष्मणराव सदाशिवराव तथा बबनराव उथळे (आण्णा), (वय ९८) यांचे काल सोमवारी रात्री ९.३० वाजता वार्धक्याने सातारा येथे निधन झाले.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यातील आदर्की बुद्रुक येथे निष्णाई देवी ग्राहक सहकारी संस्थेच्या असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानमधून २0१0 पासून मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे.
सविस्तर वृत्तमहायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर सध्या खल सुरू असून, याबाबतच्या निर्णयानंतरच शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडी एखाद्या पत्त्याप्रमाणे उडाली. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. भाजपाची राज्यात लाट आली. एकट्या भाजपाच्या पारड्यात 132 जागा पडल्या. तर महायुतीने 233 जागांची घसघशीत कमाई केली. पण अनेक ठिकाणी मतांची बेरीज नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
सविस्तर वृत्तबॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला (Shah Rukh Khan) जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रायपुरमधून फैजान खानला अटक केली होती. पण आता फैजानला वांद्रे न्यायालयातून जामीन मिळाला असल्याची माहिती समोर येत आहे.
सविस्तर वृत्तभारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शुक्रयान उपग्रह मोहिमेला आज (दि.२६) परवानगी दिली आहे. इस्रोचे संचालक निलेश देसाई यांनी या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.
सविस्तर वृत्त