बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत केलेल्या वाढीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. या गोष्टीला प्रशासन पुरेपूर मदत करत आहे. त्यामुळे बेकायदेशीर काम करुन शेतकऱ्यांना लुटण्यासाठी नवनविन क्लुप्त्या काढल्या जात आहेत.
युगप्रवर्तक कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या जयंतीनिमित्त मर्ढे येथील त्यांच्या स्मारकात मसाप, शाहुपुरी शाखा आणि मर्ढे ग्रामस्थांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी मसाप, शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, सदस्य तर अध्यक्षस्थानी मर्ढेच्या सरपंच सविता शिंगटे होत्या.
येथील माची पेठेतील बेगम मस्जिद परिसरात तीन तरसांचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री दहाच्या दरम्यान काही युवकांना रस्त्यावर तरस दिसल्याने त्यांची पळापळ झाली.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री सध्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या निवासस्थानी मुक्कामी आहेत. गृहमंत्री पदाची मागणी करूनही ती न मिळाल्याने शिंदे नाराज असल्याची चर्चा होती.
हिवाळ्यात अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढत असतो. अशावेळी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने वारंवार संसर्गजन्य आजार होण्याचा धोका निर्माण होत असतो.
भुईज हद्दीतून तिघांचे अपहरण करून एकावर चाकूने वार केल्याच्या घटनेने जिल्हा हादरला आहे. जखमी जावली तालुक्यातील असून संशयित आरोपीच्या तपासासाठी भुईज पोलीस पथक रवाना झाले आहे.
सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते.
जिल्हा परिषद चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याचे बांधकाम विभागाकडून डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र या रस्त्यावर टाकलेल्या बारिक खडीमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उसळत असून, वाहन चालविणे अवघड होत आहे.
सातारा पालिकेचे परिवहन विभागाचे अधिकारी प्रशांत निकम यांच्या पाणी न देण्याच्या आडमुठ्या धोरणाचा गोडोली ग्रामस्थांनी शुक्रवारी निषेध केला. येथील समाज मंदिर परिसरात गोडोली ग्रामस्थांनी निषेध सभा बोलवत घडल्या प्रकाराची नाराजी व्यक्त केली. आम्ही सुद्धा पालिकेचे करदेयक आहोत.