सातारा नेव्हल वेटरन्स असोसिएशनच्या वतीने आयोजित सातवा वार्षिक नौसेना दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात नुकताच साजरा करण्यात आला.
साताऱ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांची पुणे येथे भेट घेतली.
सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डी वर सातत्याने वाढते अपघात चिंताजनक बाब बनली आहे. या रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
सातारा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ (ब) साठी दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
सातारा शहरातील नवीन एमआयडीसी हद्दीत डीएम गोडाऊन येथे सातारा नगरपरिषद निवडणूक २०२५ची मतमोजणी होणार आहे.
सातारा शहरात गुरुवारी रात्री सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये कोयते व दगडांचा वापर करून एकमेकांवर हल्ला करत प्रचंड राडा केल्याची घटना घडली.
बोरगाव येथील ममता मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट प्रा. लि., या डेअरीकडून दीर्घकाळापासून दूधबिल अदा न झाल्याने दूध संकलन करणारे एजंट व शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून, या प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या त्वरित आणि प्रभावी कार्याबद्दल सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.
हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे चौथे छत्रपती, सातारा नगरीचे संस्थापक, स्वराज्यविस्तारक श्री.छ.शाहू महाराज (थोरले) यांच्या २७६ व्या पुण्यातिथीनिमित्त संगममाहुली येथील समाधीस्थळी मावळा फौंडेशनच्या पुढाकाराने कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता.
मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासासह साताऱ्यातील वीर पुत्रांची ओळख करून देणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सातारा येथे आयोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ मंगळवारी ( उद्या )होत आहे.