सातारा तालुक्यातील मौजे वारणानगर येथून दि १८ रोजी राणी बाबुराव पाटील (वय ४८ वर्ष) या राहत्या घरातून कोणास काही न सांगता निघून गेले.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून, याला शासनाच्या अपुऱ्या धोरणांची जबाबदारी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केला.
सातारा शहरातील बुधवार पेठ येथे राहणारी नुहा इमरान खान(वय १८) ही युवती दुकानातून काहीतरी घेऊन येते असे सांगून घरातून निघून गेली.
खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या मनोमिलनातील शिलेदारांची महत्त्वपूर्ण प्राथमिक टप्प्यातील बैठक सोनगाव येथील बंगल्यावर सकाळी पार पडली.
सातारकरांसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या साताऱ्यातील पोवई नाक्यावरील लढवय्या आवेशातील एकमेव शिवपुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे. जिल्ह्यात अजितदादांनी सर्वच प्रमुख विकासकामे मार्गी लावली आहेत.
सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 65 गट आणि 130 गाण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित मुलाखतींचे सत्र साताऱ्यात येथील लेक व्ह्यू हॉटेलच्या दालनामध्ये पार पडले.
भारतीय जनता पार्टीने सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून जिल्हा परिषद अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाचा उमेदवार असेल आणि त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत आहेत.
लागणार लागणार लागणार म्हणून सातत्याने चर्चेत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील बारा जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचा बिगुल अखेर आज वाजला.
स्वराज्य स्थापन करण्याची स्फूर्ती आणि शक्ती ज्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली, त्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आईसाहेब, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन प्रेरणा दिली.