मारामारी सह आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाळीव कुत्रा चावल्याप्रकरणी मालकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
विधानसभा मतदान प्रक्रियेचे कामकाज आटोपून रात्री अडीच वाजता भुईंज येथील तलाठ्याचा भुईंज येथे घरी जात असताना मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. ऊस भरून उभी असलेल्या ट्रॉलीला पाचवडजवळ पाठीमागून बाईकची धडक बसल्याने रोहित अशोक कदम (वय 28) यांचा अपघाती मृत्यू झाला.
फसवणूकीच्या गुन्ह्यात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कश्मिरा पवारसह तिच्या साथीदारांविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात आणखी एक फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयातील टेंडर देण्याचे आमिष दाखवून 14 कोटी 49 लाख रुपये 50 हजार 163 रुपयांना चुना लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सातारा जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडत असताना सातारा व कोरेगाव येथे शेवटच्या एका तासांमध्ये दोन विविध घटनांमध्ये मारामारीच्या घटना घडल्या आहेत. सातार्यात किरकोळ कारणावरून राजे समर्थकांमध्ये मारामारी झाल्याने माजी नगरसेवक वसंत लेवे यांच्यासह चौघेजण जखमी झाले.
सातारा शहरच्या उपनगरातील प्रतापसिंहनगरात मतदान संपताच बुधवारी रात्री सात वाजता दोन तरूणांमध्ये मारामारी झाली. यावेळी काही वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले.
सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी 69 टक्के मतदान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या स्वीप कार्यक्रमामुळे मतदानाचा टक्का वाढवण्यात प्रशासन यशस्वी झाले.
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एका महिलेवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
आज होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई, ठाणे तसेच पुणे येथे चाकरमानी असलेल्या जिल्ह्यातील भूमीपुत्रांनी मतदानासाठी आपापल्या गावांकडे धाव घेतल्याने काल रात्रीपासूनच मुंबईपासून पुण्यापर्यंत असलेल्या दृतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.