मोरवे, ता. खंडाळा येथील एका व्यक्तीला मतदानकेंद्रामध्ये मतदानाचा हक्क बजावतानाच तीव्र हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (बुधवारी) सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीच्या शर्वरी कृष्णा राठोड या प्रशिक्षणार्थीने गोरखपूर उत्तर प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त केले. तिच्या या यशाचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे.
श्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या अमृत महोत्सवी सोहळा आणि विष्णू पंचायतन यागाची आज मंगळवारी दुपारी सांगता झाली.
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानासाठी मतदान केंद्रांचे साहित्य वाटप करण्यात आले आहे. सर्व कर्मचारी साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचले आहेत.
कर्नल संतोष महाडिक यांनी प्राणपणाने लढा देऊन देशासाठी बलिदान केले. त्यांचे नेतृत्व गुण आणि धडाडी ही आजच्या युवा पिढीसाठी निश्चित प्रेरणादायी आहे. या बलिदानाचा कधीही विसर पडणार नाही, असे प्रतिपादन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे सातारा जिल्ह्यातील 3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्यात आलेली आहेत.
सातारा शहर परिसरात राहणारी एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेट टुगेदर म्हटलं की, हायस्कूल, कॉलेज येथील बॅचचा, ही संकल्पना. पण या सर्व बाबींपेक्षा ज्या शाळेत शैक्षणिक पाया रचला तिथे गेट टुगेदर होणे नशिबावानच मित्र म्हटले जात आहेत. झेडपीच्या शाळेतील इयत्ता चौथी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्वाचा टप्पा.