सातारा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी येथील शासकीय गोडाऊन मध्ये 40 टेबल ची व्यवस्था करण्यात आली असून 24 फेर्या मतमोजणीच्या होणार आहेत. यासाठी चारशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर होण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. सातारा-जावली मतदारसंघांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विजय निश्चित मानला जात असल्याने कार्यकर्त्यांनी शुक्रवारीच सातारा शहरामधील बर्याच ठिकाणी गुलाल आपलाच, अशा आशयाचे पोस्टर शहरातील ठिकठिकाणी झळकवले आहेत.
एका बाजूला टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट चाहत्यांना आयपीएल 2025 मेगा ऑक्शनचे वेध लागले आहेत. मेगा ऑक्शन यंदा सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 23 आणि 24 नोव्हेंबरला पार पडणार आहे.
जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागात रक्ताभिसरण योग्यप्रकारे कार्य करत नाही तेव्हा स्ट्रोक होतो. याची सुरुवातीची लक्षणे वेळीच लक्षात आल्यास व्यक्तीचा जीव वाचू शकतो. अशातच लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
एकमेकांमध्ये पोलीस कर्मचारी समोर असताना मारामारी करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी जमावावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोवई नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
दारूच्या नशेत एकाने आत्महत्या केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
चार जणांना मारहाण केल्याप्रकरणी 10 जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.