कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (बुधवारी) सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (बुधवारी) सकाळी मतदानाचा हक्क बजावला. कराड नगरपालिका शाळा क्रमांक तीनमधील मतदान केंद्रावर त्यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदान केले.
सकाळी त्यांनी निवासस्थानातून बाहेर पडताच मतदारसंघातील रेठरे बुद्रुक व कार्वे विभागातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या भेटीवेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी उत्साही वातावरणात स्वागत केले. प्रत्येक मतदान केंद्रावर त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दुपारी सव्वाबारा वाजता त्यांनी नगरपालिका शाळा क्रमांक तीनमधील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी चव्हाण कुटुंबीय उपस्थित होते.
मतदान केंद्रावर बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले, मी सकाळी मतदारसंघात भेटी देवून माहिती घेतली. प्रत्येक ठिकाणी उत्साहाने मतदार मतदान करत आहेत. मला खात्री आहे की, कराड दक्षिणची जनता राज्यात सत्ताबदल करण्यासाठी मतदान करत आहेत. सत्ताबदल झाल्यानंतर राज्य सुरळीत चालेल. मागील दहा वर्षे खूप अडचणीची होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आर्थिक घडी सुरळीत चालेल. तसेच शेतकरी व लोकांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल.