अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू
अपघातातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : अपघातातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोडोली, ता. सातारा येथील जानाई मळाई देवी कमानीजवळ गाडी खड्डयात पडल्याने विनोद मारुती कुर्हाडे (वय 23, रा. शाहूनगर, ता. सातारा) हा युवक जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी प्रथम जिल्हा रुग्णालयात नंतर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची खबर बंडगार्डन पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार एस. पी. जगताप यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस हवालदार गुरव तपास करत आहेत.