सोयाबीनची चोरी
सुमारे 50 हजारांच्या सोयाबीनची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : सुमारे 50 हजारांच्या सोयाबीनची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ११ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या पूर्वी कुशी, तालुका सातारा येथील मुनीर अकबर शेख यांच्या दीड एकर क्षेत्रातील अंदाजे 50 हजार रुपये किंमतीचे काढणीस आलेले सोयाबीन पीक अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.