त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांनी संगम माहुलीचा घाट ठरला अविस्मरणीय
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संगम माहुली येथील प्राचीन काशी विश्वेश्वर मंदिर येथे सकल हिंदू समाज संगम माहुली पंचक्रोशी, सद्गुरु ब्रह्मचैतन्य सेवा मंडळ, कामेश कांबळे मित्र समूह आणि शिवभक्त मित्र समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णामाईची महाआरती कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
सातारा : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संगम माहुली येथील प्राचीन काशी विश्वेश्वर मंदिर येथे सकल हिंदू समाज संगम माहुली पंचक्रोशी, सद्गुरु ब्रह्मचैतन्य सेवा मंडळ, कामेश कांबळे मित्र समूह आणि शिवभक्त मित्र समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णामाईची महाआरती कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
यावेळी सोळशीच्या शनैश्वर देवस्थानचे महंत नंदगिरी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुकुंद आफळे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, आमदार महेश शिंदे यांच्या भगिनी डॉक्टर अरुणाताई बर्गे, आर एस एस चे महेश शिवदे, परिसरातील युवा नेतृत्व कामेश कांबळे, संदीप शिंदे, राहुल शिवनामे, जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
संगम माहुली येथील काशीविश्वेश्वर मंदिर परिसरात दिव्यांची मनमोहक आरास, भक्तीगीतांचा सुश्राव्य कार्यक्रम, किल्ले बांधणी स्पर्धेतील चिमुकल्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत कृष्णामाईची भक्तिमय वातावरणात महाआरती करण्यात आली. कृष्णा काठावर करण्यात आलेला मनमोहक लेझर लाईट शो आणि फटाक्यांची भव्य आतषबाजी पाहून उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले. याचवेळी वेदांगी मुकुंद अफळे यांनी सीए परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सोळशीच्या नंदगिरी महाराज यांनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच आशीर्वादही दिले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास कामेश कांबळे मित्र समूह, सोनगाव निंब, संगम माहुली, क्षेत्र माहुली, महागाव, खावली तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सातारा शहरातीलही नागरिकांची मोठी उपस्थिती होती.