खंडणीसह नुकसान केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
खंडणीसह एकाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : खंडणीसह एकाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ६ ते ८ दरम्यान शंभू जगन्नाथ भोसले रा. अमरलक्ष्मी, कोडोली, सातारा यांना १५ हजार रुपये खंडणी मागून, धमकी देऊन त्यांच्या अजंठा चौक सातारा येथील शिवशंभो आईस्क्रीम पार्लर व चहा नाष्ट्याच्या दुकानाला आग लावून सुमारे दोन लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी दाद्या पवार व सुजल जाधव यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सावंजी करीत आहेत.