अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा
अपघातात महिलेस जखमी केल्याप्रकरणी कार चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात महिलेस जखमी केल्याप्रकरणी कार चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ६ रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ज्योती प्रकाश पेटकर रा. यादोगोपाळ पेठ, सातारा या राजवाडा भाजी मंडईकडून पंचपाळी हौदाकडे पायी चालत येत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या कार क्र. एमएच ११ बीएल ७१९१ वरील चालकाने त्यांना धडक दिली या अपघातात पेटकर जखमी झाल्या असून कारचालक पळून गेला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार हिरवे करीत आहेत.