अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी पित्यावरच गुन्हा
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिच्या पित्याविरोधातच सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिच्या पित्याविरोधातच सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात बापानेच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वडिलाविरुध्द पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. ४ नोव्हेबर रोजी घडली आहे. तसेच मुलीला व तिच्या आईला संशयिताने मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल करत आहेत.