अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात ९ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तानाजी श्रीरंग जाधव वय ३५, रा. पवळेश्वर, ता.सातारा याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. ५ नोव्हेबर रोजी घडली आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरडे करीत आहेत.