फायनान्स चे ऑफिस फोडून 40 हजारांच्या साहित्याची चोरी
एका फायनान्स कंपनीचे ऑफिस फोडून अज्ञात चोरट्यांनी 40 हजारांच्या साहित्याची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : एका फायनान्स कंपनीचे ऑफिस फोडून अज्ञात चोरट्यांनी 40 हजारांच्या साहित्याची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक सहा ते सात दरम्यान अमित अशोक रजपूत रा. खेड, ता. सातारा यांच्या अहिरे कॉलनी, देगाव रोड येथे असलेल्या मनीग्रो इन्वेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस ऑफिसचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ऑफिस मधील दोन लॅपटॉप, दोन मोबाईल आणि एक हार्ड डिस्क असा सुमारे ४० हजारांचा ऐवज लंपास केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.