युवा नेते रमेश उबाळे यांची रिपब्लिकन सेनेत थेट महाराष्ट्र नेतेपदी निवड
समाजकारणातून मोठ्या प्रमाणात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सातारा जिल्ह्यातील युवा नेते श्री रमेश अनिल उबाळे यांनी आज रिपब्लिकन सेनेचे सेनाप्रमुख आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते पक्ष कार्यालयात मुंबई या ठिकाणी जाहीर प्रवेश केला.
मुंबई : समाजकारणातून मोठ्या प्रमाणात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सातारा जिल्ह्यातील युवा नेते श्री रमेश अनिल उबाळे यांनी आज रिपब्लिकन सेनेचे सेनाप्रमुख आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते पक्ष कार्यालयात मुंबई या ठिकाणी जाहीर प्रवेश केला. श्री उबाळे यांच्या कार्याची महती माहित असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र नेते पदी निवड करून त्यांचा सन्मान राखला गेला.
मुंबई येथील आंबेडकर भवन, दादर या ठिकाणी सुमारे दीड तास संपूर्ण फुले-शाहू - आंबेडकर चळवळ व सातारा जिल्ह्याचे योगदान याबाबत विचार विनिमय करून चर्चा करण्यात आली.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी चा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी श्री उबाळे यांच्याशी व्यक्तिगत रित्या संपर्क साधला. आंबेडकरी विचारांचा वारसा जपत असताना सत्तेची समीकरण जुळवण्यासाठी त्यांनी रिपब्लिकन सेना यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे जाणले. त्यानंतर गोकुळदास पास्ता रोड, दादर येथील आंबेडकर भवन मध्ये आदरणीय रिपब्लिकन सेना पक्षप्रमुख आनंदराव आंबेडकर, प्रदेश महासचिव विनोद काळे आणि मुंबई प्रदेश उपाध्यक्ष अमोल रोकडे, अँड . अमन आनंदराज आंबेडकर व सातारा जिल्हाध्यक्ष विशाल भोसले, जिल्हा महासचिव नितीन रोकडे, युवा नेते जमीर भोसले व राहुल गायकवाड, सचिन कांबळे, संदीप शेरे, मुस्ताक शेख, प्रमोद कांबळे, अमोल झिंब्रे, सुधाकर देवकांत, विकास साठे, दिपक आवळे, गणेश मोहिते, प्रभाकर जाधव,सुधीर वायदंडे व इतर सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू व संविधान प्रत देऊन पक्षप्रमुख श्री आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्व विश्वास व्यक्त केला.
सातारा जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेना व शिवसेना एकत्रित या शैक्षणिक सांस्कृतिक व राजकीय सामाजिक कार्यामध्ये एकमेकांच्या सहकार्याने मार्गक्रमण करतील. असा विश्वास व्यक्त करण्यात आला. लवकरच शिवशक्ती- भीमशक्ती एकत्रितरीत्या मेळावा घेऊन सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंटरी व पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती देण्यात आली. महायुतीतील शिवसेनेसोबत युती असल्याने रिपब्लिकन सेनेला सन्मानाची वागणूक मिळत आहे. एवढेच नव्हे तर लवकरच सत्तेमध्ये ही वाटा मिळणार आहे. अशी माहिती वरिष्ठांनी दिली आहे.
रिपब्लिकन सेने मध्ये पक्षप्रमुख सन्माननीय आनंदराज आंबेडकर यांच्याकडून महाराष्ट्र नेते पद निवडीचे पत्र घेताना युवा नेते श्री रमेश अनिल उबाळे व मान्यवर
- निनाद जगताप, मुंबई.