आदेशाचे उल्लंघन प्रकरणी सर्कस व्यवस्थापकावर गुन्हा
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्कस व्यवस्थापकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्कस व्यवस्थापकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान अप्पर जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता विनापरवाना कोटेश्वर मैदान, शुक्रवार पेठ, सातारा येथे न्यू गोल्डन सर्कसचे खेळ सुरू करून अपर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी समाधान रामचंद्र जेधे रा. मु. पो. मोड निंब, ता. माढा, जिल्हा सोलापूर या गोल्डन सर्कसच्या व्यवस्थापकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक शेख करीत आहेत.