शाहूपुरी पोलिसांकडून बॅटऱ्या चोरणाऱ्या आरोपीला अटक
करंजे पेठ येथील रहिवासी रमेश रघुनाथ शेडगे (वय ३९) यांनी दि.५ रोजी झेड पी कॉलनी, म्हसवे रोड येथे अमोल गार्डे यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या ट्रकवरील १५ हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरीची फिर्याद शाहूपुरी पोलिसांत दिली होती
सातारा : करंजे पेठ येथील रहिवासी रमेश रघुनाथ शेडगे (वय ३९) यांनी दि.५ रोजी झेड पी कॉलनी, म्हसवे रोड येथे अमोल गार्डे यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या ट्रकवरील १५ हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरीची फिर्याद शाहूपुरी पोलिसांत दिली होती,त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या सूचनेनुसार पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदार आणि फिर्यादीच्या माहितीनुसार सदर गुन्हा त्यांच्या परिसरात राहणाऱ्या इसमानेच केला असल्याची माहिती मिळाली.त्याअनुषंगाने पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याच पकडून अटक केली.
दत्ता बबन ठोंबरे(वय ३३वर्ष)रा. पिल्लेश्वरीनगर,करंजे असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे.त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत वाढे फाटा,करंजे परिसरात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनातून चोरलेल्या गुन्ह्यातील दोन बॅटऱ्या व इतर चारचाकी वाहनांच्या आठ अशा एकूण ५५ हजार रुपये किमतीच्या १0 चारचाकी गाड्यांच्या बॅटऱ्या हस्तगत केल्या असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवालदार सोनाली माने करीत आहेत.