दुचाकीची चोरी
एका हॉटेल समोर पार्क केलेल्या दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : एका हॉटेल समोर पार्क केलेल्या दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक एक ते तीन दरम्यान महादेव हणमंत कुंभार रा. शिरवळ, ता. खंडाळा यांची सुरभी हॉटेल समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस नाईक साबळे करीत आहेत.