विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेपाच ते पाच वाजण्याच्या दरम्यान एका विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी समीर शेख, सलीम शेख दोघेही रा. यादोगोपाळ पेठ सातारा यांचे विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.