साताऱ्यात भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी रिंगणात
सातारा शहराच्या राजकारणात जायंट ठरलेल्या भाजप राजे गटाला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे.
सातारा : सातारा शहराच्या राजकारणात जायंट ठरलेल्या भाजप राजे गटाला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. मव्याच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून सुवर्णाताई पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. तसेच भाजपचे सक्रिय सदस्य सुनील काळे कर यांनी सुद्धा तुतारी चिन्ह हाती घेतल्याने बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 21 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आठ तर काँग्रेस पक्षाच्या वतीने एकूण 16 उमेदवारांची अशा 45 उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपले नशीबआज मावण्याचे ठरवले आहे. महाविकास आघाडीने महायुतीच्या राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून साताऱ्यात राजकीय हालचाली गतिमान केल्या होत्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे मुलाखत कार्यक्रम घेऊन त्याचा अहवाल महाविकास आघाडीचे प्रमुख समन्वयक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना सादर केला. त्यानुसार दोन टप्प्यांमध्ये दुपारी साडेबाराच्या दरम्यान तिन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे अर्ज दाखल करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस राजकुमार पाटील, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रणव सावंत तसेच काँग्रेस महिला आघाडीच्या रजनीताई पवार यांच्या उपस्थितीमध्ये हे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बारकुल यांना सादर करण्यात आले.
महायुतीने बंडखोरीचा फटका बसणार नाही याची काळजी घेतली मात्र काही ठिकाणी इच्छुकांना डावललेगेल्याने काही जणांनी थेट महाविकास आघाडीचा रस्ता धरला. डॉक्टर संदीप काटे यांचे नाव पहिल्यापासून नगराध्यक्ष पदाच्या चर्चेत होते मात्र राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष म्हणून सुवर्णाताई पाटील यांचे नाव चर्चेत आले. सुवर्णाताई यांची राजकीय कारकीर्द तसेच, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा अनुभव उत्तम राजकीय समन्वय आणि मजबूत महिला संघटन यामुळे महाविकास आघाडीला सुवर्णाताई पाटील यांचा चेहरा सशक्त वाटल्याने त्यांची नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचा आक्रमक आणि आघाडीचा चेहरा म्हणून सुवर्णाताई पाटील यांनी मुंबईत थेट मोर्चे बांधणी केली होती, मात्र तेथे हुलकावणी मिळाल्याने सुवर्णाताई थेट महाविकास आघाडीच्या गोटात दाखल झाल्या. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सुनील काळे कर यांनी सुद्धा महाविकास आघाडीचे तुतारीचिन्ह हाती घेत बंडाचा झेंडा फडकवला आहे ते साताऱ्याच्या प्रभाग पाच मधून इच्छुक आहेत.
भाजपच्या राजकीय रणनीतीवर लक्ष ठेवणाऱ्या महाविकास आघाडीला साताऱ्यात उमेदवारांची जुळवा जुळवा करताना बरीच दमछाक झाली. शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक नितीन बानगुडे पाटील यांच्या दोन धावत्या आढावा बैठका होऊ नये अनुभवी संघटन कौशल्य आणि दमदार कार्यकर्त्यांची फळी यांची अडचण झाल्याने शिवसेनेला कट्टर शिवसैनिक आणि नवखे चेरे यांचा समन्वय साधत दहा जागांवर जुळणी करता आली आहे. सातारा शहर परिसरात काँग्रेस कागदोपत्री मजबूत वाटत असली तरी प्रत्यक्षात इलेक्टिव्ह मेरिट चे उमेदवार जुळवताना त्यांची ही अडचण झाली होती तरीसुद्धा मुलाखत दिलेल्या एकूण 24 उमेदवारांपैकी 16 जणांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची यादी उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे साताऱ्यात लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून भाजपचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार अमोल मोहिते विरुद्ध महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुवर्णाताई पाटील यांच्यात समोरासमोर लढत होणार आहे. सातारा शहरात 156 मतदान केंद्रे असून एक लाख 48 हजार मतदान आपल्या तीन मतांचा हक्क बजावणार आहेत.