मोटारसायकल व स्पोर्ट सायकल चोरीचे २ गुन्हे २४ तासाच्या आत उघड, सातारा शहर डी.बी. पथकाची कारवाई
सातारा सिव्हील हॉस्पीटल येथून दि. ८ रोजी मोटारसायकल आणि १२ रोजी शाहनगर येथून ५० हजार रुपये किंमतीची स्पोर्ट सायकल चोरी झालेली होती.
सातारा : सातारा सिव्हील हॉस्पीटल येथून दि. ८ रोजी मोटारसायकल आणि १२ रोजी शाहनगर येथून ५० हजार रुपये किंमतीची स्पोर्ट सायकल चोरी झालेली होती. असे वेगवेगळे दोन गुन्हे सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.चोरटयांचा शोध घेवून सदरचे गुन्हे उघडकिस आणण्याबाबत वरिष्ठांनी मार्गदर्शन व सुचना डी.बी. पथकास केल्या होत्या. त्याप्रमाणे डी.बी.पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित १९ वर्षीय युवकांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे कसून चौकशी केली असता चोरी करणारे इसमांची माहिती समोर आली,
सुदीप संजय मेंगळे,(वय१९)रा.लक्ष्मीटेकडी, सदरबझार व विकास प्रभाकर कोळी,(वय.१९)रा.वनवासवाडी सातारा येथून ताब्यात घेतले. त्यांचेकडून चोरीची मोटारसायकल व स्पोर्ट सायकल असा एकूण १ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधिक्षक तुषार दोशी,अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले,वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक श्याम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.हवा. निलेश यादव,सूजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पो.ना.पंकज मोहिते, पो.कॉ.तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मचिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने. सुशांत कदम, सुहास कदम यांनी केलेली आहे.