बेकायदेशीर मालमत्ता जवळ बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा
बेकायदेशीर मालमत्ता जवळ बाळगल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : बेकायदेशीर मालमत्ता जवळ बाळगल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सातारा शहर बसस्थानक परिसरात वैभव मोहन धडांबे रा. दिवडी, ता. माण, जि. सातारा हा बेकायदेशीररित्या मोबाईल हँडसेट सह दिसला. त्याला मोबाईलच्या मालकी हक्काबाबत कोणताही पुरावा सादर न करता आल्याने त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी. जी. पवार करीत आहेत.