अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शेंद्रे ता. सातारा गावच्या हद्दीतील अजिंक्यतारा साखर कारखाना समोर विक्रम पाटील उर्फ दीपक बबन पोतदार रा. खिंडवाडी ता. सातारा हे मनोरुग्ण पादचारी रस्त्यावरून भंगार गोळा करत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक देऊन जखमी केले आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देशमाने करीत आहेत.