बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील हॉटेल प्राईड समोरुन दि. 1 रोजी दुचाकीची (एमएच 50 क्यू 3689) अज्ञाताने चोरी केली. याबाबत अविनाश शंकर साळुंखे (वय 30, रा. कर्मवीरनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार मेचकर तपास करत आहेत.