अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 31 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विलास उर्फ यल्ल्या शरणाप्पा कुरमणी रा. आंबेडकर भवन, बॉम्बे रेस्टॉरंट, सातारा हा संशयितरित्या स्वतःचे अस्तित्व लपवून बालाजी हॉटेलच्या पाठीमागे आडोशाला बसलेला आढळून आला. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.