अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी पिकअप चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी पिकअप चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजपथावरील राजलक्ष्मी टॉकीजसमोर झालेल्या अपघात प्रकरणी अनिल घाडगे याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 12 ऑक्टोबर रोजी पिकअप वाहनाची धडक बसल्याने अमोल राजेश्वर पवार (वय 30, रा. धायरी फाटा, पुणे) हे जखमी झाले.