तडीपार गुन्हेगाराकडून बंदूक, काडतुसे जप्त
शिवाजीनगर, ता. सातारा गावच्या हद्दीत बोरगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तडीपार केलेल्या संशयिताकडून देशी बनावटीची बंदूक, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल व दुचाकी असा 2 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वेणेगाव : शिवाजीनगर, ता. सातारा गावच्या हद्दीत बोरगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तडीपार केलेल्या संशयिताकडून देशी बनावटीची बंदूक, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल व दुचाकी असा 2 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मनोज ऊर्फ सोन्या वाघमारे (रा. कुमठे, ता. सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
सपोनि डी. एस. वाळवेकर यांना तडीपार असलेला संशयित मनोज ऊर्फ सोन्या वाघमारे हा शिवाजीनगर येथे दुचाकीवरून येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शिवाजीनगर येथे बसथांब्याजवळ सापळा रचला. बसथांब्याजवळ संशयित आला असता पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, तो न थांबल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.
यावेळी पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, देशी बनावटीची एक बंदूक तसेच खिशात दोन जिवंत काडतुसे मिळून आली. सपोनि धोंडीराम वाळवेकर, महिला पोलिस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार प्रशांत चव्हाण, दीपककुमार मांडवे, केतन जाधव, सतीश पवार, उत्तम गायकवाड, विशाल जाधव यांनी ही कारवाई केली.