एकास मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांना विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांना विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 22 रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास सोनगाव तालुका सातारा येथे तेथीलच अजय मधुकर जाधव यांना तू आमच्या सोबत बाहेर जेवायला का आला नाहीस, असे म्हणून प्रकाश शंकर जाधव, ऋषिकेश प्रकाश जाधव आणि प्रणव प्रकाश जाधव सर्व रा. सोनगाव ता. सातारा यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच दमदाटी केली. अधिक तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.