एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर-पुणे महामार्गावर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एकजण पायी चालत महामार्ग ओलांडत असताना ट्रक क्र. एमएच 43 बीपी 4466 वरील चालक ज्ञानेश्वर राजेंद्र बडदे रा. कोडीत, ता. पुरंदर, जि. पुणे यांच्या ट्रकने धडक दिल्याने संबंधित इसमाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेलार करीत आहेत.